अशोकराव आपला हा वैचारिक विरोध, शत्रुत्व नाही – Devendra Fadnavis
दिवंगत गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री आज एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते.
दिवंगत गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री आज एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमात भाषण करताना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) मुद्दा मांडला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडलं आहे. अशोक चव्हाण यांनी विदर्भात बुलेट ट्रेन जातीय त्याप्रमाणं नांदेड मार्गे हैदराबादला जावी, ती मराठवाड्यात यावी, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा देतो पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजवा की मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.