काँग्रेसला रामराम… अशोक चव्हाण यांनी भाजपचं ‘कमळ’ घेतलं ‘हाती’, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान, गेली कित्येक वर्षांची काँग्रेसची साथ सोडून अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने आता भाजपाची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजपच्या पक्ष कार्यालयात हजर झाले होते.
Published on: Feb 13, 2024 01:55 PM
Latest Videos