कुठल्या घोड्यावर बसल्यावर फायदा होतो हे पंकजा यांनी ठरवावं : अशोक चव्हाण
माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांच्या ठाकरे गटातील ऑफरवर प्रतिक्रिया दिली. म्हणाले, पकंजा मुंडे यांना राजकीय परिस्थितीची जाण आहे परंतु...
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खुली ऑफर दिली आहे. सातत्याने भाजपकडून अन्याय होत असून पंकजा यांच्यासाठी मातोश्रीची दारे उघडी असल्याचे असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते, त्यानंतर राजकीय वर्तुळात या संदर्भात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
अशातच माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांच्या ठाकरे गटातील ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, पंकजा मुंडे या मराठवाड्यातील भाजपच्या कर्तृत्ववान नेत्या असून त्यांना कित्येक वर्षांपासून पाहत आहे. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहे. पण त्यांनी कोणत्या पक्षात जावं कोणत्या नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, पंकजा मुंडे या राजकीय परस्थिती जाणतात. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यावर फायदा होतो, हो त्यांनी ठरवावं.