Special Report | अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भूकंप आणणार?

| Updated on: Sep 02, 2022 | 10:17 PM

फडणवीस किंवा भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याशी माझी भेट झालेली नाही. मी शनिवारी दिल्लीतल्या काँग्रेसच्या रॅलीत सहभाग घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं, त्यामुळं शिवसेनेत उभी फूटच पडली. शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. तर 10 अपक्ष आमदारांनाही सोबत घेतलं. तर अशोक चव्हाणही फक्त एकटेच जाणार नाहीत, तर जवळपास काँग्रेसचे 12 आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आलेच, तर काँग्रेसला तो मोठा झटका असेल.

मुंबई : एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) तब्बल 40 आमदार फोडून राजकीय भूकंप घडवला आणि भाजपसोबत सत्ताही स्थापन केली.आता काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाणंही(Ashok Chavan) मोठा धमका करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजप समन्वयक आशिष कुलकर्णींच्या घरी, अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

चव्हाण-फडणवीसांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय त्यामुळं अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का अशी चर्चा आहे ?
इतकंच नाही तर काँग्रेसचा एक गटच भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. मात्र या भेटीवरुन स्वत: देवेंद्र फडणवीसांनी इन्कार केलाय.

फडणवीस किंवा भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याशी माझी भेट झालेली नाही. मी शनिवारी दिल्लीतल्या काँग्रेसच्या रॅलीत सहभाग घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं, त्यामुळं शिवसेनेत उभी फूटच पडली. शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. तर 10 अपक्ष आमदारांनाही सोबत घेतलं. तर अशोक चव्हाणही फक्त एकटेच जाणार नाहीत, तर जवळपास काँग्रेसचे 12 आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आलेच, तर काँग्रेसला तो मोठा झटका असेल.

5 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत मुख्यमंत्री राहिलेत. 2010 मध्ये आदर्श सोसायटीत नातेवाईकांच्या फ्लॅट दिल्याच्या आरोपामुळं राजीनामा द्यावा लागला. 2014 च्या मोदी लाटेतही नांदेडमधून अशोक चव्हाण खासदारही झाले. त्यानंतर 2019 मध्ये चव्हाणांनी पुन्हा भोकर मतदारसंघातून विधानसभा लढवली आणि आमदार झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते

अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज आहेत, अशी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहेच. शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळीही अशोक चव्हाण उशीरा आले त्यामुळं ते मतदान करु शकले नाहीत. यावरुन अशोक चव्हाणांना पक्षानं कारणे दाखवा नोटीसही बजावली होती
फक्त अशोक चव्हाणच नाही तर आणखी 4 ते 5 आमदारही बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते.  उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अदृश्य हातांचा पाठींबा म्हणत, आभार मानले होते.

देशात काँग्रेसची स्थिती अतिशय चिंताजनक झालीय. अजून फूलटाईम अध्यक्ष सुद्धा मिळालेला नाही. राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष व्हायला तयार नाही. त्यातच सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांची यादी वाढत चाललीय. नुकतंच गुलाब नबी आझादांनीही काँग्रेसला रामराम ठोकला. आता अशोक चव्हाण धक्का देणार का ?, आणि तसं झालं तर महाराष्ट्र काँग्रेससाठी तो प्रचंड मोठा हादरा असेल.

Published on: Sep 02, 2022 10:17 PM
Ashok Chavhan : अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस यांची भेट, चव्हाण भाजपमध्ये येणार का?
Special Report | अमित शाहा राज ठाकरेंची भेट घेणार?