विकेन्डला अशोका धबधब्यावर ‘ओव्हरफ्लो’ गर्दी, प्रशासनाच्या ‘त्या’ निर्णयानं हौशी पर्यटकांचा हिरमोड
VIDEO | विकेन्ड सुट्टीमुळे मुंबई-नाशिकच्या हौशी पर्यटकांची निसर्गरम्य ठिकाणी धाव, कसारा नजीकच्या अशोका धबधब्यावर तुफान गर्दी
ठाणे, ३१ जुलै २०२३ | पावसाळा आला की निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. राज्यातील असे बरेच ठिकाण आहेत ते पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करत असतात. मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अशा ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात बंदी घालण्यात आली होती. सलग शनिवार, रविवार असलेल्या विकेन्ड सुट्टीमुळे मुंबई-नाशिकच्या हौशी पर्यटकांनी शहापूर तालुक्यातील कसारा नजीकच्या निसर्गरम्य अशा अशोका धबधब्यावर तुफान गर्दी केली आणि निसर्गच्या कधी ऊन तर कधी पाऊस अशा लहरी स्वभावाचा मनमुराद आनंद लुटला. माञ अशोका धबधब्यावर खबरदारीच्या निर्णयामुळे जिल्हा प्रशासनाच्या मनाई आदेश दिला. परंतु या निर्णयामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Jul 31, 2023 08:26 AM
Latest Videos