राज्यपाल फालतू…. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देताना असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबींवर भाष्य करत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांनी सरकार उलथवून लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली, अशा शब्दात घटनात्मक पदावर बसलेलल्या व्यक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले होते
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबींवर भाष्य करत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांनी सरकार उलथवून लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली, अशा शब्दात घटनात्मक पदावर बसलेलल्या व्यक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. याबाद्दल भाष्य करत असताना असीम सरोदे यांनी राज्यपालांना फालतू माणूस असं म्हटलं होतं. तेव्हा भगत सिंह कोश्यारी राज्यपदावर होते. तर वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काय झालं? त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाविरोधात कसा निकाल घेतला? याचे कायदेशीर विवेचन करत असताना त्यांनी राज्याच्या माजी राज्यपालांचा सर्वात फालतू माणूस असा उल्लेख केला.