'तुम्ही हिंदीत बोला...', कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला ठाकरे गटाच्या नेत्यानं विचारला जाब

‘तुम्ही हिंदीत बोला…’, कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला ठाकरे गटाच्या नेत्यानं विचारला जाब

| Updated on: Jan 04, 2025 | 10:40 PM

कामासाठी मराठी मुलं नको म्हणणाऱ्या कंपनीच्या मालकाला चांगलाच दणका देण्यात आला आहे. मुंबईतील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने आम्हाला कामासाठी मराठी मुलं नको असं म्हटलंय. यानंतर ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारलाय. ‘मराठी माणसाला नोकरी देणार नाही म्हणतात मराठी लोक. मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात. बसायला बसण्यासाठी मी आलो नाहीये. तुम्ही […]

कामासाठी मराठी मुलं नको म्हणणाऱ्या कंपनीच्या मालकाला चांगलाच दणका देण्यात आला आहे. मुंबईतील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने आम्हाला कामासाठी मराठी मुलं नको असं म्हटलंय. यानंतर ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारलाय. ‘मराठी माणसाला नोकरी देणार नाही म्हणतात मराठी लोक. मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात. बसायला बसण्यासाठी मी आलो नाहीये. तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही. नाही त्याचा उत्तर विचारायला आलोय’, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला चांगलंच झापल्याचे पाहायला मिळाले. ‘महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार. तीन मुलांचे बाहेर काढले मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी. मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही म्हणजे महाराष्ट्रात धंदा करू नका ना, असे म्हणत चांगलंच खडसावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jan 04, 2025 10:29 PM