Maharashtra Assembly : मतदानाची वेळ संपली, दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात आज झालेल्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या दिवशी या निवडणुकीत कोणी बाजी मारली हे समोर येणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज दिवसभर मतदान पार पडलं आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात आज झालेल्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या दिवशी या निवडणुकीत कोणी बाजी मारली हे समोर येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील मतदान करणाऱ्या मतदारांचा आकडा हा अनेक ठिकाणी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत होता. महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान पार पडलं. मुंबई शहरात ४९.६० टक्के, मुंबई उपनगरात ५१. ७६ टक्के मतदान झालं. यासोबतच पुण्यात ५४.०९ तर ठाण्यात ३८.९४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात ५६.०६ टक्के मतदान झालं. गडचिरोली सारख्या नक्षल भागात ६९. ६३ टक्के नागरिकांनी मतदान केलं. अकोला येथे ५६.१६ टक्के, संभाजीनगर येथे ६०.८३ टक्के, सोलापूर येथे ५७,०९ टक्के मतदान पार पडलं. बघा तुमच्या जिल्ह्यात किती टक्के मतदारांनी मतदान करून आपलं कर्तव्य बजावलं?