ATM in Railway : प्रवास करताना पैसे संपले तरी ‘नो टेन्शन’, आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
बँक ऑफ महाराष्ट्रने हे एटीएम मशीन पुरवले असून ते मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला एक शटर देखील लावण्यात आलं आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएमचे काम योग्य रितीने सुरू राहवं यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
आता रेल्वेने प्रवास करताना तुमच्या जवळचे पैसे संपले तरी नो टेन्शन कारण.. आता धावत्या रेल्वेमध्ये तुम्हाला ATM च्या माध्यमातून पैसे काढता येणार आहे. भुसावळ विभागाकडून पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा चाचणी सुरू कऱण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे तिकीटाच्या भाडे व्यतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक नाविन्यपू्ण निर्णय भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला रोख रकमेची गरज भासली तर रेल्वेतच पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. भुसावळ रेल्वे विभागाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं असून त्यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बँकेच्या सहकार्याने धावत्या ट्रेनमध्ये देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा सुरू करण्यासाठी भुसावळ विभागाकडून चाचणी घेण्यात येत आहे. दरम्यान, असे नाविन्यपूर्ण पाऊल रेल्वेने उचलल्याने रेल्वेतच एटीएम सेवा उपलब्ध करून देत भुसावळ विभागाकडून एक नवीन बेंचमार्क स्थापित करण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक 12110 मनमाड – मुंबई सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेसवर चाचणी सुरू आहे. दररोज धावणाऱ्या या एक्स्प्रेसला 22 कोच आहेत. हे एटीएम ट्रेनच्या वापरात नसलेल्या डब्यात बसवल्याने प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार

बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....

युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?

हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल

पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
