काँग्रेस आमदाराच्या जीवाला धोका! अंगावर ट्रक घालून केला जीवे मारण्याचा प्रयत्न, कुठं घडला प्रकार?
VIDEO | नाशिक-पुणे मार्गावर वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीत काँग्रेस आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा केला प्रयत्न, राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करून काय दिली माहिती?
मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक-पुणे मार्गावर राजेश राठोड यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. ते मुंबईहून जालन्याकडे चालले होते. त्यावेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीत ही घटना घडली. राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन स्वतः ही माहिती दिली. ‘गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. मला घातपाताची शक्यता वाटते. पोलीस, सरकार, गृहविभागाने ताताडीने चौकशी करावी, याची अधिकची माहिती मी द्यायला तयार आहे, सरकारने तातडीने उपायोजना करणं आवश्यक आहे’, असे राजेश राठोड यांनी म्हटले तर राजेश राठोड यांना करणी सेनेकडून काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. दरम्यान, राजपूत भामटा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण राजेश राठोड यांनी लावून धरले होते. मात्र ही धमकी मिळाल्यानंतर आमदार राजेश राठोड यांनी पोलीस सुरक्षा देण्यात आली होती.