Aurangabad: जायकवाडी धारण 100 टक्के भरण्याच्या तयारीत

| Updated on: Jul 23, 2022 | 1:15 PM

संततधार पावसामुळे औरंगाबाद येथील जायकवाडी धारण (Jayakwadi Dam) 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 32 टक्क्यांवरून 87 टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे लवकरच तो 100 टक्क्यांची पातळी गाठणार आहे. सलग पाचव्या वर्षी जायकवाडी धारण 100 टक्के भरणार आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 87 टाक्यांवर पोहोचला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे धारण म्हणून जायकवाडी […]

संततधार पावसामुळे औरंगाबाद येथील जायकवाडी धारण (Jayakwadi Dam) 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 32 टक्क्यांवरून 87 टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे लवकरच तो 100 टक्क्यांची पातळी गाठणार आहे. सलग पाचव्या वर्षी जायकवाडी धारण 100 टक्के भरणार आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 87 टाक्यांवर पोहोचला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे धारण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. जलसाठा 90 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर धरणाचे गेट उघडून पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. नाशिक आणि नगर जिल्हातून जायकवाडीसाठी तब्बल 48,440 क्युसेकने पाणी येत आहे. यामुळेच जायकवाडीचा पाणीसाठा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातंय.

Published on: Jul 23, 2022 01:15 PM