कांद्याचा महाराष्ट्राशी वांदा? शेजारच्या राज्याचं सहकार्य; मात्र…. येथे मिळतोय तिप्पट भाव
मात्र यावर्षी अचानकच कांद्याचे भाव कमालीचे घसरले. कांद्याला फक्त शंभर रुपयाचा भाव मिळू लागला. त्यामधून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा अक्षरशा रस्त्यावर फेकून दिला. शेतकऱ्यांवर रडण्याचीच वेळ आली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड वैजापूर आणि गंगापूर हे कांद्याचे हब म्हणून ओळखले जाणारे तालुके आहेत. या तालुक्यात दरवर्षी लाखो क्विंटल कांदा पिकवला जातो. मात्र यावर्षी अचानकच कांद्याचे भाव कमालीचे घसरले. कांद्याला फक्त शंभर रुपयाचा भाव मिळू लागला. त्यामधून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा अक्षरशा रस्त्यावर फेकून दिला. शेतकऱ्यांवर रडण्याचीच वेळ आली. तर ज्यांनी कांदा साठवला ते आपला कांदा थेट शेजारच्या राज्यात तेलंगणात नेत आहेत. तेथील राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करत आहे. तर महाराष्ट्रातील कळीच्या मुद्द्यात थेट हात घालत तेलंगणाचे मुख्यमंत्री हे चंद्रशेखर राव प्रयत्न करत आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाला चांगला भाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. येथील हैदराबादच्या मार्केटमध्ये कांद्याची खरेदी सुरू झाली असून तिप्पट भाव कांद्याला मिळत आहे. राज्यात कांद्याला 400 500 ते 700 रुपयांचा भाव मिळत असून तेलंगणात तो 1900 रुपये भावानं खरेदी केला जात आहे.