औरंगाबादेत मनसेला पुन्हा धक्का; सुहास दशरथे भाजपच्या वाटेवर?
औरंगाबादमध्ये मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. सुहास दशरथे यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्यापासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सध्या सुहास दशरथे हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सुहास दशरथे यांना पक्षात घेण्याबाबत भाजप नेत्यांकडून देखील चाचपणीला सुरुवात झाली आहे.