Video | अंबादास दानवेंची सभा, अचानक बत्ती गुल... काय घडलं?

Video | अंबादास दानवेंची सभा, अचानक बत्ती गुल… काय घडलं?

| Updated on: Nov 05, 2022 | 2:29 PM

अंबादास दानवेंच्या या विशेष सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यभरात शिंदे गठाकरे ट विरुद्ध (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांच्या एकानंतर एक धडाकेबाज सभा सुरु आहेत. यातच शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची सभा सुरु होती. आणि अचानक सभेच्या ठिकाणावरची लाईट गेली. ही घटना घडलीय औरंगाबादच्या (Aurangabad) निंभोरे गावातली. संध्याकाळी अंबादास दानवे यांचं भाषण सुरु होतं. अचानक गावातली बत्तीगुल झाली. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी मोबाइलच्या टॉर्च लावल्या आणि संपूर्ण सभास्थळावर प्रकाश पसरला. याच वातावरणात अंबादास दानवेंची सभा पार पडली. त्यांच्या या विशेष सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

Published on: Nov 05, 2022 02:29 PM