AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा, औरंगजेबाच्या कबरीवरुन महायुती विरुद्ध मविआ

औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा, औरंगजेबाच्या कबरीवरुन महायुती विरुद्ध मविआ

| Updated on: Mar 16, 2025 | 10:49 AM

औरंगजेबाच्या कबरिवरून राज्यात वाद पेटलाय. औरंगजेबाची कबर काढली नाही तर खुलताबादमध्ये येऊन कारसेवा करण्याची धमकी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिलीये. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय

औरंगजेबाच्या कबरीवरून नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. औरंगजेबाची कबर काढावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात 17 मार्चला बजरंग दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. तर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ही राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिलं जाणार आहे. सरकारने भूमिका न घेतल्यास औरंगजेबाची कबर उध्वस्त करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये असलेल्या कबरीजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिलिंद एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी करण्यात आलीये. औरंगजेबाची कबर हटवली तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास कसा सांगणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर अफजल खान आणि औरंगजेबाला याच मातीत गाडलं हे पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर ही कबर राहिली पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले. दानवे यांच्या या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांनी ही पलटवार केला आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा हा राजकारणासाठी वापरला जात असल्याची टीका रोहित पवार आणि आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 16, 2025 10:49 AM