उद्धव ठाकरे स्वत:चं पाप धुण्यासाठी अयोध्येला आले होते, आम्ही मात्र…; रामदास कदम यांचा टोला
मागच्या वेळी उद्धव ठाकरे पाप धुण्यासाठी अयोध्येला आले होते. आम्ही शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होताना पाहण्यासाठी अयोध्या नगरीत आलोय, असं रामदास कदम म्हणाले आहेत.
लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री आमदार आणि शिवसेनेच्या नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना प्रमुखांची दोन स्वप्नं होती. एक म्हणजे 370 कलम हटवणं आणि दुसरं राम मंदिर उभारणं. ही दोन्ही स्वप्न देशाच्या पंतप्रधानांनी हे पूर्ण केली आहेत. नुकताच न्यायालयाचा निकाल आला. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण आम्हाला मिळालंय. राम आणि धनुष्यबाण हे कोणीचं वेगळं करू शकत नाही. म्हणून आम्ही रामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत, असं रामदास कदम म्हणाले आहेत. ज्या दिवशी उद्धवजींनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तो रावणाचा विचार होता. त्यामुळे रावण कोण राम कोण हे पाहायची आज ही वेळ नाही. आम्ही इथं भक्तीपोटी आलो आहोत, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 09, 2023 07:13 AM
Latest Videos