आंबोली पासून जवळच असलेला ‘हा’ धबधब्याला पर्यटकांची पसंती, उसळतेय पर्यटकांची गर्दी
वर्षा पर्यटकांसाठी सावडाव धबधबा आणि आंबोली धबधबा सध्या डेस्टिनेशन बनला आहे. पण आता या दोन्ही धबधब्या प्रमाणेच निसर्गाचा सुंदर अविष्कार असलेला आंबोली पासून जवळच असलेल्या कुभवडे गावातील बाबा धबधबा पुढे येत आहे.
सिंधुदुर्ग, 06 ऑगस्ट 2013 | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडाव धबधबा आणि आंबोली धबधबा हा पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले धबधबे आहेत. येथे धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी होताना दिसत असते. वर्षा पर्यटकांसाठी सावडाव धबधबा आणि आंबोली धबधबा सध्या डेस्टिनेशन बनला आहे. पण आता या दोन्ही धबधब्या प्रमाणेच निसर्गाचा सुंदर अविष्कार असलेला आंबोली पासून जवळच असलेल्या कुभवडे गावातील बाबा धबधबा पुढे येत आहे. हा धबधबा नयनरम्य असून दोन्हीं बाजूंनी पाहता येतो, त्यामुळे पर्यटकांना तो आकर्षित करत असतो. तर विशेष म्हणजे दिवंगत माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी मालकीच्या जागेत हा असून तो पर्यटकांना खूला आहे. या धबधब्याचं सौदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं. तर आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळणारा धबधबा पाहायला मिळतो.