‘बच्चू कडू लाचार…’, रवी राणांचा पलटवार, विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा जुंपली

बच्चू कडू आणि रवी राणा पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू यांनी भाजपसह रवी राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या टीकेनंतर बच्चू कडू यांनी पलटवार केलाय.

'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा जुंपली
| Updated on: Nov 02, 2024 | 10:09 AM

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना बच्चू कडू आणि रवी राणा पुन्हा एकदा जुंपली आहे. अचलपूरच्या महायुतीच्या उमेदवारावरून बच्चू कडू यांनी भाजपवर शरसंधान साधत रवी राणांना डिवचलंय. दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेनंतर रवी राणांनी देखील शाब्दिक हल्ला चढवत पलटवार केलाय. यावेळी रवी राणा यांनी अचलपूरमध्ये भाजपला संपवल्याचा आरोप देखील बच्चू कडू यांनी केलंय. तर याला देखील रवी राणांनी जशासतसं उत्तर दिलंय. ‘रवी राणा अचलपूरमध्ये भाजप संपवणार आम्हाला संपवण्याची गरज नाही’. असं बच्चू कडू म्हणाले तर भाजप खूप मोठा पक्ष आहे. बच्चू कडू लाचार होऊन विधानं करताय. अचलपूरमध्ये परिवर्तन होणार असल्याचे म्हणत रवी राणांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. यंदा अचलपूरमध्ये बच्चू कडूंना तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात असल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. अचलपूरमध्ये प्रहार संघटनेकडून बच्चू कडू, काँग्रेसकडून अनिरूद्ध देशमुख आणि भाजपकडून प्रवीण तायडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे विजय कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow us
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.