Bachchu Kadu : ‘आमच्याकडे द्या…दोन दिवसांत सगळं बाहेर काढू’, राज्याच्या गृहखात्यावर बच्चू कडूंचा हल्लाबोल
आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत कर्जमाफी झाली पाहिजे अशी मानसिकता आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणत आहेत, मग घोडं अडलं कुठे? असा सवाल करत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कडू म्हणाले, दर एक-दोन महिन्यांनी बीडमधून काही वेगळंच ऐकायला मिळतं. ही गंभीर बाब आहे. राज्याचं गृहखातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, घडलेल्या घटनेनंतर दूध का दूध और पाणी का पाणी व्हायला किती वेळ लागतोय? असा सवाल करत आमच्याकडे द्या दोन दिवसांत सगळं बाहेर काढू, असं आव्हानच बच्चू कडू यांनी दिलंय. तर दोन ते तीन टकले सोडले तर हे सरकार पूर्ण तुमचं… असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या नितेश राणेंच्या या वक्तव्यावर बच्चू कडूंनी चांगलाच हल्लाबोल केलाय. ‘हिंदुत्वाचा विचार भाजपने एकदा पक्का करायला पाहिजे. आता ईदच्या निमित्ताने भाजपने मोदी ए सौगत मुस्लिमांना दिली. जर काँग्रेसने ईदच्या निमित्ताने भेट दिली असती तर तुम्ही बोभाटा केला असता काँग्रेसचा धर्म बदलला असता. तुमचं हिंदुत्व नेमकं कसं आहे. तुमच्या हिंदुत्वामध्ये मुस्लमानांना काय स्थान आहे, बुद्धांना काय स्थान आहे?’, असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की

लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार

ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप

हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?
