असा बच्चू कडू आहे, पटत असेल तर ठेवा नाहीतर... सरकारवर पुन्हा एकदा संतापले

असा बच्चू कडू आहे, पटत असेल तर ठेवा नाहीतर… सरकारवर पुन्हा एकदा संतापले

| Updated on: Jan 31, 2024 | 11:09 AM

पुन्हा एकदा सरकारवर बच्चू कडू संतापल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे मराठ्यांच्या आंदोलनात येतो म्हणणारे बच्चू भाऊ का येत नाही? असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. ग्रामीण आणि शहरी भागातील घरकूल योजनेतील तफावतीवरून बच्चू भाऊ सरकारवर संतापलेत.

मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : सरकारमध्ये असले तरी आमदार बच्चू कडू सरकारला अधून-मधून सरकारला इशारे देत असतात. पुन्हा एकदा सरकारवर बच्चू कडू संतापल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे मराठ्यांच्या आंदोलनात येतो म्हणणारे बच्चू भाऊ का येत नाही? असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. ग्रामीण आणि शहरी भागातील घरकूल योजनेतील तफावतीवरून बच्चू भाऊ सरकारवर संतापलेत. लोकशाहीमध्ये असा जातीवाद होत असेल तर आपण बोलणारच…सरकारमध्ये ठेवा किंवा काढून टाका…आपण स्वतःहून सरकारमध्ये आलो नाही तर तुम्हीच मला स्वतःहून फोन केला, असे बच्चू कडू म्हणाले. शिंदेंच्या बंडानंतर बच्चू कडूही गुवाहटीला गेले होते. गुवाहाटीला आपण गेल्याचे त्यांनी म्हटले. अर्थात तो फोन फडणवीस यांचाच होता. काय होता देवेंद्र फडणवीस यांचा तो गुवाहाटीचा फोन कॉल? बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 31, 2024 11:07 AM