तिसऱ्या आघाडीचे उमेदवार जाहीर होताच बच्चू कडू म्हणाले, ‘आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण…’
राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट समोरासमोर आणि चुरशीची लढत यंदा होणार आहे. अशातच आज राज्यातील तिसऱ्या आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर बच्चू कडू यांनी युती आणि आघाडीवर निशाणा साधला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या आघाडीच्या पहिल्या यादीत पहिलंच नाव हे आमदार बच्चू कडू यांचं आहे. बच्चू कडू यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. आघाडीत बिघाडी होणार आणि युतीमधील एक जण फुटणार असल्याचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर हा निशाणा साधला आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार करत बच्चू कडूंनाच खोचक टोला लगावला आहे. बच्चू कडू यांना किती भविष्य कळत माहिती नाही, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले?

अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना

बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...

कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?

भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
