Bachchu Kadu : शरद पवारच आता अजित पवार यांच्यासोबत जातील… बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य करत खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार हेच आता अजित पवार यांच्यासोबत जातील असं वाटतंय, असं वक्तव्य कडूंनी केल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार हेच आता अजित पवार यांच्यासोबत जातील असं वाटतंय, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना बच्चू कडू यांनी हा खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील चार आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. हे चार आमदार म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आहे, असं म्हणत पत्रकाराने बच्चू कडू यांना सवाल केला. यावेळी बच्चू कडू यांनी थेट प्रतिक्रिया देत शरद पवारच हेच आता अजित पवार यांच्यासोबत जातील…असं म्हणत खोचक टोला शरद पवार यांना लगावला. दरम्यान, सध्या राज्यात किल्ले रायगडवर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर देखील आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. यासंदर्भातही बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याचे सरकारने परीक्षण करावं.. त्याची समाधी तिथे कशी आली? यावर माहिती घ्यावी. सरकार भांडण लावायचे काम करते. आमची समाधी घ्यायची वेळ आली, त्याचं काही नाही या देशात, असं म्हणत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोट ठेवले.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
