Bachu Kadu : ‘आम्ही उठलो तर सरकार उठेल’, बच्चू कडू यांचा थेट कोणाला इशारा

Bachu Kadu : ‘आम्ही उठलो तर सरकार उठेल’, बच्चू कडू यांचा थेट कोणाला इशारा

| Updated on: Aug 24, 2023 | 1:34 PM

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरून राज्याचे राजकीय तापमान हे तापत आहे. त्याच दरम्यान प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य करत एकच खळबळ उडवून देली आहे.

सातारा : 24 ऑगस्ट 2023 | राज्यात होणाऱ्या 2024 मधील निवडणुकीवरून सध्या राजकीय पक्षांची धावपळ पाहायला मिळत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट, शिवसेना यातही उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तर अजून विधानसभा निवडणुकांना अवकाश असल्याने त्याबाबत अजुन काही हालचार दिसत नाही.

याचदरम्यान प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी 2024 मधील विधानसभा निवडणुकांवरून मोठं भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला जागा वाटपावरून टोला लगावला आहे.

कडू यांनी जागा वाटपाचा अभ्यास त्या पक्षांनी करावा. पण आम्हाला १५ जागा हव्यात. तर प्रहारचे १० ते ११ आमदार निवडणून येतील असे म्हणताना, आम्ही जिथे बसू तिथे सरकार आणि आम्ही उठलो तर सरकार उठणार, असे म्हटलं आहे. तर सरकार उठणार म्हणजे सरकार पडणार का? असा अर्थ सध्या लावला जात आहे.

Published on: Aug 24, 2023 01:34 PM