Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र दिलं तरी…, मागासवर्गीय आयोगाचं मोठं वक्यव्य
VIDEO | एका जातीचं प्रमाणपत्र दुसऱ्या जातीला दिलं. तरी कास्ट व्हॅलिडीटीमध्ये ते बसू शकत नाही. जर समजा मराठ्यांना कुणबी जातीतून प्रमाणपत्र दिलं. तरी ते पुढे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, असे मत मागासवर्गीय आयोग सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर, २२ ऑक्टोबर २०२३ | मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे, असा याचा अर्थ होतो. एका जातीचं प्रमाणपत्र दुसऱ्या जातीला दिलं. तरी कास्ट व्हॅलिडीटीमध्ये ते बसू शकत नाही. जर समजा मराठ्यांना कुणबी जातीतून प्रमाणपत्र दिलं. तरी ते पुढे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे, असे मत मागासवर्गीय आयोग सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी व्यक्त केले. तर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी नाही. मात्र त्यांची मागणी अशीच दिसते. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, यात काय फरक आहे? असा सवाल करत मराठा समाजाला ओबीसी आयोगाने आरक्षण देण्याची शिफारस तत्कालीन गायकवाड आयोगाने केली आहे. त्याच्यामुळे पुन्हा शिफारस करण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असे चंद्रलाल मेश्राम यांनी म्हटले आहे.