Shahrukh Khan Son Bail | आर्यन खानला जामीन मंजूर, अटी काय?

Shahrukh Khan Son Bail | आर्यन खानला जामीन मंजूर, अटी काय?

| Updated on: Oct 28, 2021 | 5:55 PM

गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Bail granted to Aryan Khan)

Published on: Oct 28, 2021 05:30 PM