'हे' अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; राष्ट्रवादी नेत्याची सरकारवर टीका

‘हे’ अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; राष्ट्रवादी नेत्याची सरकारवर टीका

| Updated on: Apr 20, 2023 | 2:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मिटकरी यांनी, जेव्हापासून हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाल्याचे म्हटलं आहे

अकोला : बाळापूरचे आमदार ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांना नागपूर जवळ अटक करण्यात आली. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारवर याच्याआधीच सडकून टीका केली आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मिटकरी यांनी, जेव्हापासून हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाल्याचे म्हटलं आहे. तसेच याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नितीन देशमुख यांना झालेली बेकायदेशीर अटक. तर अकोला जिल्ह्यामधील आजची स्थिती पाहता राज्यघटनेचा पार बोजा उडाल्याचेच दिसत असून महाराष्ट्रात लोकशाही शिल्लक असेल असे दिसत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सुनेचे. उद्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता येईल. तेव्हा या क्रुरतेची परतफेड महाविकास आघाडी करेल असा इशारा ही त्यांनी दिला.

Published on: Apr 20, 2023 02:23 PM