इर्शाळवाडीत घडलेली घटना दुर्देवी, मृतांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

“इर्शाळवाडीत घडलेली घटना दुर्देवी, मृतांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे”, काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 20, 2023 | 1:56 PM

रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे.तर ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे.तर ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “इर्शाळवाडी गावात घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. सगळी यंत्रणा तिथे पोहोचली आहे. मदतकार्य सुरु आहेत. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे. सरकारने योग्य उपाय योजना करायला हवी. इथल्या नागिरकांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी केले पाहिजे.”

Published on: Jul 20, 2023 01:56 PM