गोरक्षक हत्येवरून नांदेड हादरलं; आज किनवट बंद
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गोरक्षणासाठी काही तरूण काम करत आहेत. जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना एखाद्या गोष्टीची शंका आली तर ते त्यावर काम करतात.
नांदेड : येथे एका एका गोरक्षकाची हत्या झाल्याने सध्या वातावरण तंग झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गोरक्षणासाठी काही तरूण काम करत आहेत. जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना एखाद्या गोष्टीची शंका आली तर ते त्यावर काम करतात. मात्र त्याच कामात शेखर रामलु रापेल्ली हा गोरक्षक मारला गेला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे सध्या नांदेडच्या किनवटमध्ये तणावाचे वातावरण पसरलय. या हत्येचा निषेध करण्यासाठी किनवट तालुक्यातील इस्लामपूर बाजारपेठ आज बंद पाळण्यात आलाय. इस्लापुर शहरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतः बंद ठेवत या हत्येचा निषेध केलाय. तर किनवट तालुक्यातील शिवणी आणि चिखली गावातील काही गोरक्षक एका कार्यक्रमासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. परतत असताना त्यांना अप्पारावपेठजवळ एका पिकअप बोलेरोवर संशय आला. ज्यात गोवंश असावा असं त्यांना वाटलं. त्यातून त्यांनी त्या पिकअपचा पाठलाग केला. आणि ही घटना घडली.