श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेत ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच बॅनरवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपवारून मविआ आणि शिवसेना-भाजप युतीत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची डोकेदु:खी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाने बॅनरबाजी केली आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच बॅनरवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेतून भाजप कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेसाठी उतरवण्यास प्रयत्नशील आहे. तर शिवसेनेला आणि भाजपला मात देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

