‘होय, हा कुटुंब वाचवण्याचा लढा आणि…’, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह पुण्यात बॅनरबाजी
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर, कुठं झळकले बॅनर्स?
पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई शहरासह पुणे शहरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनर्सबाजी करण्यात आली आहे. ‘होय हा कुटुंब वाचवण्याचा लढा, देश हेच माझं कुटूंब’ हे उद्धव ठाकरे यांचे उद्गार पुण्यात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर पाहायला मिळतंय. बॅनर्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडून विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे, पुणे शहरातील टिळक रोड, स्वारगेट परिसरात उद्धव ठाकरे यांचे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सची पुणे शहरात सध्या जोरदार चर्चा होत आहे. तर संपूर्ण मुंबई शहरातही उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स जागो-जागी लावल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांच्या फोटोनजीक भावी पंतप्रधान असा उल्लेख देखील करण्यात आला आहे.