बारामतीत राडा, युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या, कारण काय?
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात असून त्यांच्यात लढत होते. अशातच मतदान प्रक्रिया सुरू असताना युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे
राज्यात आज २८८ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. अशातच बारामतीच्या मतदारसंघात सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कारण लोकसभेनंतर विधानसभेलाही पवार विरूद्ध पवार असा सामना रंगतोय. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात असून त्यांच्यात लढत होते. अशातच मतदान प्रक्रिया सुरू असताना युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे. ‘मतदान केंद्राच्या आत स्वत:च्या घरातलं लग्न कार्य असल्यासारखं, या, बसा मतदान केलं का? अशी विचारणा सुरु होती. खाण खुणा केल्या जात होत्या’, असा आरोपच युगेंद्र पवारांची आई शर्मिला यांच्याकडून अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर केला जात आहे. मतदान करणाऱ्यासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांना घडाळ्याचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या वाटण्यात येत आहेत, असा आरोप शर्मिला पवारांनी केला. ‘मी आज सकाळपासून निघाली आहे. काटेवाडी, कान्हेरीत गेली. मी दुसऱ्या ठिकाणी चालले होते, इथे येण्याचा इरादा नव्हता. पण बालकमंदीरच्या मतदानकेंद्रात आल्यावर हा प्रकार दिसला. बाहेर येऊन त्यांनी अजित पवार गटाच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.