प्रचाराच्या तोफा थंडावल्या, बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
रोहित पवार भाषणाच्या वेळी भावूक झालेत. तर अजित पवारांनी मिमिक्री करत हा रडीचा डाव असल्याची टीका केली. रोहित पवारांनी लाव रे तो व्हिडीओ करत देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर प्रश्न केला. तर यापूर्वी भावकीचं राजकारण होईल असं म्हणत अजित पवारांचा कंठ दाटून आला होता. त्यानंतर भावकीवरून रंगलेलं राजकारण भावूक होण्यावरून चर्चेत राहिलं. बघा स्पेशल रिपोर्ट
बारामतीसह ११ मतदारसंघाचा प्रचार काल ५ मे रोजी थांबला आहे. शेवटच्या दिवशी प्रचार करताना दोन्ही पवारांमध्ये शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. रोहित पवार भाषणाच्या वेळी भावूक झालेत. तर अजित पवारांनी मिमिक्री करत हा रडीचा डाव असल्याची टीका केली. रोहित पवारांनी लाव रे तो व्हिडीओ करत देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर प्रश्न केला. फडणवीस म्हणाले होते बारामतीतील लढाई ही अजित पवार विरूद्ध शरद पवार नसून मोदी विरूद्ध राहुल गांधी आहे. मात्र रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ दाखवून भाजपच्या भूमिकेवर टीका केली आहे. तर यापूर्वी भावकीचं राजकारण होईल असं म्हणत अजित पवारांचा कंठ दाटून आला होता. त्यानंतर भावकीवरून रंगलेलं राजकारण भावूक होण्यावरून चर्चेत राहिलं. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय बोलताना अजित पवार आणि रोहित पवार भावूक झाले?
Published on: May 06, 2024 10:12 AM
Latest Videos