Barsu Katal Shilp : बारसूमधील कातळशिल्प ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जाहीर होणार?
बारसूमधील कातळशिल्पांच्या बाजूने हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. बारसूमधील कातळशिल्प 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून जाहीर होणार?
मुंबई, ११ मार्च २०२४ : बारसूमधील कातळशिल्प ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जाहीर करा, अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. बारसूमधील कातळशिल्पांच्या बाजूने हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. तर हायकोर्टाकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण आणि बारसू प्रकल्पामुळे कातळ शिल्प चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. कोकणातील रत्नागिरी-राजापूर भागात कातळ शिल्प आढळतात. कोकणातील जांभ्या दगडावर ही कातळ शिल्प कोरलेली आहेत. प्राण्याची चित्र, मानवी आकृती, विविध भौमितिक आकार या खडकाळ भागावर आढळतात. थोडक्यात काय तर दगडावर कोरलेली चित्रं. पण चित्रं मानवी उत्क्रांती साक्ष देतात. कोकणात आढळणारी कातळ शिल्प जवळपास 45 हजार वर्षे जुनी असल्याचं बोललं जातं आहे.