Walmik Karad : बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे पोलिसांवर गंभीर आरोप
Beed Crime News : आठवले गँगला बीडच्या कारागृहातून नाशिक जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर गीते गँगला बीडच्या कारागृहातून संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेलं आहे.
आठवले गँगला बीडच्या कारागृहातून नाशिक जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर गीते गँगला बीडच्या कारागृहातून संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेलं आहे. कारागृहात झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही गँगला वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता बीड कारागृहात आता फक्त कराड गँग उरलेली आहे.
दरम्यान, गीते गँगला हर्सुल कारागृहात नेत असताना महादेव गीते याने बीडच्या कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप करत, कारागृहातले पोलीस कराडला मदत करत असल्याचं गीतेने म्हंटलं आहे. तर आज आठवले गँगने देखील आमचा संबंध नसताना आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जात असल्याचं म्हंटलं आहे.
Published on: Apr 01, 2025 07:13 PM
Latest Videos

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
