AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad wealth Video : आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, वाल्मिक कराडची संपत्ती होणार जप्त?

Walmik Karad wealth Video : आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, वाल्मिक कराडची संपत्ती होणार जप्त?

| Updated on: Jan 26, 2025 | 2:38 PM

संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. मकोका अंतर्गत गजाआड असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज एसआयटीने बीड कोर्टात केलाय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला वाल्मिक कराड अर्थात आकाचा खजिना खतर्‍यात आलाय. कोणत्याही पदावर नसताना करोडोंची संपत्ती, जमिनी आणि मोठमोठ्या शहरात जमवलेल्या मायेशी कराडचे लागेबंदे समोर आलेत. त्यामुळे एसआयटीने कराडच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती व्हावी, असा बीड कोर्टाकडे अर्ज केलाय. त्यामुळे समोर आलेल्या संपत्ती शिवाय कराडने अजून कुठ कुठ प्रॉपर्टी जमवली आहे ते शोधून लवकरच त्याच्या संपत्तीवर टाच येऊ शकते. आरोपानुसार पुणे, हडपसर, वाकड, खराडी, मगरपट्टा, अमिनोरा टॉवरमध्ये आलिशान फ्लॅट्स आणि ऑफिसेस, विविध लोकांच्या नावाने, माजलगावात 75 एकर, बारशीत 36 एकर, लातूरच्या टेंभुर्डी महामार्गा लगत 5 एकर, माणजरसुबात 9 एकर, जामखेडमध्ये 15 एकर, बीडमध्ये 50 एकर, सोन्पेठमध्ये 25 एकर केज बीड आणि परळीत 4 ते 5 वाईन शॉप अशा ठिकाणी कराडने स्वतःसह विविध लोकांच्या नावाने संपत्ती जमवून ठेवल्याचा आरोप आहे. दरम्यान जेलमधून आजारपणाच्या कारणाने सध्या कराड बीडच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये आहे. त्यावरून एकट्या कराडसाठी आयसीयूमध्ये मोठा तामजाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 26, 2025 02:32 PM