भंडाऱ्यात अवकाळीचं थैमान सुरूच, शेतपिकांसह फळबागा जमिनदोस्त अन्…
VIDEO | शेतकऱ्यांची चिंता वाढली, अवकाळीने शेतपिकांसह फळबागांच मोठं नुकसान, बळीराजा हवालदिल
भंडारा : मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसानं मात्र उसंत घेतली नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. हवामान विभागानं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असून काल दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापणीला आलेले धान या गारपिटमुळे अक्षरेश: धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाले आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेती ही नष्ट झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडून पडल्याने काही ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.