Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत बीआरएसमध्ये इनकमिंग तर भंडाऱ्यात आऊटगोईंग, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षाची भाजपमध्ये एंन्ट्री

सांगलीत बीआरएसमध्ये इनकमिंग तर भंडाऱ्यात आऊटगोईंग, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षाची भाजपमध्ये एंन्ट्री

| Updated on: Aug 02, 2023 | 8:34 AM

सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यात काल अनेकांनी त्यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्याही समावेश आहे. एकीकडे सांगलीत इनकमिंग सुरू असतानाच भंडाऱ्यात पक्षाला भडदाड पडण्याची सुरूवात झाल्याचे समोर आले आहे.

भंडारा, 02 ऑगस्ट 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यात काल अनेकांनी त्यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्याही समावेश आहे. एकीकडे सांगलीत इनकमिंग सुरू असतानाच भंडाऱ्यात पक्षाला भडदाड पडण्याची सुरूवात झाल्याचे समोर आले आहे. येथे अपात्रतेची टांगती तलवार असलेले भंडारा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा बीआरएस पक्षाचे नेते संदीप ताले यांच्यासह अन्य दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही घटना नाट्यमयरीत्या झाल्याने सध्या याची चर्चा होत आहे. तर यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप ताले हे बीआरएस पक्षाचे विदर्भाचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात.

Published on: Aug 02, 2023 08:33 AM