राष्ट्रवादी पक्षफुटीचा परिणाम पवार कुटुंबातील नात्यांवर देखील झालाय. बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन वेगळे पाडवे साजरे झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पवार कुटुंबातील भाऊबीजेकडे देखील सर्वांचं लक्ष होतं. मात्र गोविंद बागेत सुप्रिया सुळेंनी संपुर्ण कुटुंबासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी अजित पवारांचं कुटुंब सोडून सर्व पवार कुटुंब गोविंदबागेत एकत्रित येत भाऊबीज साजरी केली. बारामतीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील भाऊबीज साजरी केली. बारामतीत त्यांनी त्यांच्या घरी बहिणींसह भाऊबीज साजरी केली. यावेळी युगेंद्र पवार यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी देखील भाऊबीज साजरी केली. पुण्यातील शेवाळेवाडी निवासस्थानी येथे रूपाली चाकणकर यांनी भाऊबीज साजरी केली. तर भाजपचे आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. आशा भोसलेंनी आपल्या निवासस्थानी आशिष शेलारांचं औक्षण केलं. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी चित्रा वाघ यांच्याकडून औक्षण करून घेतलं आणि भाऊबीज साजरी केली. यावेळी या दोघांनी महायुतीचं सरकार येऊदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊदे अशी भावना व्यक्त केली. बघा आणखी कोणाची कशी झाली भाऊबीज?