Sushma Andhare : राजकारणात अभ्यासू महिला नेत्या असाव्यात, नौटंकी…, सुषमा अंधारे यांच्यावर कुणाचा घणाघात
VIDEO | राजकारणात सुषमा अंधारे यांच्यासारख्या नाटकी नेत्या नसाव्यात इतकेच नाही तर राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात, आणि त्या मोठ्या प्रमाणात याव्यात, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा जोरदार हल्लाबोल.
पुणे, २० ऑक्टोबर २०२३ | ‘राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात, आणि त्या मोठ्या प्रमाणात याव्यात, अशी माझ्या महिला कार्यकर्त्याची मागणी आहे. याचा मला अभिमान वाटतो.’, असे म्हणत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या शिवसेनेत आल्यात खरंतरं त्यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्याच पक्षात त्या गेल्यात. मात्र आता त्यांना चांगलं पद हवं म्हणून त्या वारंवार टीका करताना दिसतात. डोळे दाबून खोटे आश्रू आणायचे आणि नौटंकी करायची, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या ही नौटंकी बसं करा, सुधरा आता कारण तुमच्यामुळे इतर महिलांकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन वेगळा होतोय.