‘या’ राष्ट्रीय महामार्गावरून जाताय? जरा जपून… अल्पावधीतच पडल्या भेगा
VIDEO | दीड ते दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या 'या' राष्ट्रीय महामार्गाचे काम उघड्यावर, अल्पावधीतच पडल्या भेगा अन् बांधकाम विभागाचं दुर्लक्ष
भंडारा : मागील चार वर्षापासून परभणी जिंतूर महामार्ग या रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे. मात्र अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, परभणी जिंतूर हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच रस्त्याला तडा पडल्याचे समोर आले होते. आता तुमसर- रामटेक या राष्ट्रीय महामार्गाचं वास्तव समोर आले आहे. तुमसर- रामटेक या राष्ट्रीय महामार्गाचे काम दीड ते दोन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या रस्त्याला महामार्गाच्या स्वरूप देण्यात आला. महामार्गाच्या बांधकामात शासनाकडून करोडो रुपये खर्च करण्यात आले, परंतु त्याचा योग्य तो उपयोग झाला नसल्याने या तुमसर- रामटेक राष्ट्रीय महामार्गावर जागो जागी भेगा पडल्याचं दिसतंय. दिवसेंदिवस रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. बऱ्याच जागी या राष्ट्रीय मार्गावर मोठ-मोठ्या भेगा आणि खड्डे पडले आहे. या महामार्गवर पडलेल्या भेगा आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेत. अनेकांना अपंगत्व आले. या महामार्गाची दूरावस्था झाली आहे. त्यामुळे या कामाची उच्च स्ततरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची गावकरी करीत आहे.