शरद पवार यांचं पंतप्रधान पद कसं हुकलं? प्रफुल्ल पटेल यांनी केला मोठा खुलासा

शरद पवार यांचं पंतप्रधान पद कसं हुकलं? प्रफुल्ल पटेल यांनी केला मोठा खुलासा

| Updated on: Dec 14, 2023 | 4:03 PM

पंतप्रधान होण्याची संधी हातात असूनही पवार यांनी या संधीला नकार दिला होता. पवार यांनी ही संधी का घेतली नाही? याचा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीवर केला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं कर्जत येथे शिबीरात प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं असं देशातील जनतेला वाटतं. राजकारणातील अभ्यासू, राजकारणातील चाणाक्य व्यक्तिमत्तव म्हणजे शरद पवार. शरद यांना पंतप्रधानपदाची संधीही आली होती हे बऱ्याच जणांना माहिती नसेल पण हे खरं आहे. मात्र पवार यांनी ही संधी घेतली नाही. पंतप्रधान होण्याची संधी हातात असूनही पवार यांनी या संधीला नकार दिला होता. पवार यांनी ही संधी का घेतली नाही? याचा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीवर केला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं कर्जत येथे शिबीरात प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची इच्छा होती. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष केलं. त्यानंतर एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले. पण सीताराम केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त शरद पवार यांच्या घरी आले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंती सर्वांनी केली. त्यावेळी देवेगौडा यांचा मला फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा. शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तर माझ्या मनात खंत कायम असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.

Published on: Dec 14, 2023 04:01 PM