Bigg Boss Marathi Season 5 : अखेर प्रतीक्षा संपली! ‘बिग बॉस’च्या अलिशान घराची पहिली झलक, बघा VIDEO
'बिग बॉस मराठी'चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या स्पर्धकांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
शंभर दिवसांचा राडा ज्या घरात होत आलाय ते घर आता स्पर्धकांचं जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. बिग बॉसच्या या अलिशान घरातमध्ये गेले 4 सिझनच्या स्पर्धकांनी तुफान राडा घातला होता. आता पुन्हा एकदा नवा कोरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या स्पर्धकांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे. रितेश देशमुख आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवणार आहे. या खेळात धमाल आहे, मस्ती मज्जा असणार आहे, मनोरंजनाचा राडा आहे, धुरळा आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन येत्या रविवारपासून दररोज रात्री 9 वाजेपासून ‘कलर्स मराठी’वर तुम्हाला पाहता येणार आहे.