बिहारमध्ये सत्तांतर, ईडी-सीबीआय अॅक्शन मोडमध्ये, झारखंड-बिहारमध्ये महत्वाच्या नेत्यांच्या घरी छापेमारी
नुकतंच बिहारमध्य सत्तांतर झालंय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलंय. अश्या सगळ्या परिस्थितीत सीबीआयकडून पहिली छापेमारी करण्यात आली आहे. आरजेडी नेते सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. तर दुसरीकडे ईडीने 17 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीय. अवैध खाणकाम आणि खंडणी […]
नुकतंच बिहारमध्य सत्तांतर झालंय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलंय. अश्या सगळ्या परिस्थितीत सीबीआयकडून पहिली छापेमारी करण्यात आली आहे. आरजेडी नेते सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. तर दुसरीकडे ईडीने 17 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीय. अवैध खाणकाम आणि खंडणी प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकले जात आहेत. प्रेम प्रकाश यांचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळचे नेते पंकज मिश्रा यांची चौकशी केल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे.
Published on: Aug 24, 2022 09:58 AM
Latest Videos