मुंबईत या ३० ठिकाणी भीमयात्रा, तर ठाकरे यांच्या वरळीत लेझर शो
VIDEO | भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मुंबई भाजपतर्फे २२७ वॉर्डमध्ये विविध कार्यक्रम
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उद्या मुंबई भाजपा तर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेजर शो वरळीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली. लोखंडवाला कांदिवली पूर्व, दिंडोशी आरे कॉलनी, वर्सोवा जीवन नगर, कुर्ला नेहरु नगर, महाराणा प्रताप चौक माझगाव, कुलाबा, नायगाव, पंचशिल नगर २ सायन कोळीवाडा, चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते लाल डोंगर ते वाशी नाका तसेच गोवंडी स्टेशन, विक्रोळी, संविधान चौक मानखुर्द शिवाजी नगर, घाटकोपर पश्चिम, रमाबाई नगर घाटकोपर पूर्वसह भांडूप, मुलुंडसह एकुण ३० ठिकाणी जयंती निमित्त भीमयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील जांबोरी मैदानात भाजपा पदाधिकारी संतोष पांडे यांच्या पुढाकाराने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा भव्य लेजर शोचे आयोजन रविवार, दि. 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत करण्यात आले आहे. २००x१०० फुटाच्या भव्य पडद्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन गौरव असलेला लेझर शो विनामुल्य आयोजित करण्यात आला आहे.

अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या

घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार

पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?

देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
