भाजप म्हणतंय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
मलिकांवर भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेत. तेच मलिक काल सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलंय
मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : सकाळी ज्या नवाब मलिक यांच्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सवाल केले होते, त्याच मलिकांवरून संध्याकाळ होईपर्यंत महायुतीत मतभेत असल्याचे समोर आले. मलिकांवर भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेत. तेच मलिक काल सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलंय. विरोधात असताना देशद्रोही, नंतर वर्षभराने सत्तेतील सहकारी यावरून भाजपच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झालेत. निमित्त होतं ते राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचं…जामीन मिळाल्यानंतर मलिक पहिल्यांदाच सभागृहात हजर राहिले. तेही सत्ताधारी अजित पवार यांच्या गटातील बाकांवर बसल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरूवात केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट