Prakash Mahajan : ‘पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ अन् शोकाकूल’, शेलारांनी राज ठाकरेंसोबत मैत्री तोडली, मनसे नेत्यानं उडवली टिंगल
‘मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे राज ठाकरे.. आणि आशिष शेलार त्यांच्याशी मैत्री ठेवणार नाही. त्या माणसाची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल’, असं प्रकाश महाजन म्हणाले.
आशिष शेलार म्हणाले राज ठाकरेंसोबतची मैत्री संपुष्टात आणली. त्यामुळे मनसे परिवार खूप शोकाकूल झाला आहे. आशिष शेलार आमचा चांगला मित्र, कसं काय नाराज झाला? असा खोचक सवाल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला. ते आशिष शेलार यांच्या प्रतिक्रियेवर बोलत होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भात आशिष शेलारांना सवाल केला असता त्यांनी राज ठाकरे हे वैयक्तिक मित्र विषय संपला असं म्हणत आपली भूमिका जाहीर केली होती. यावरूनच प्रकाश महाजनांना शेलारांची टिंगल उडवल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरे सध्या महाराष्ट्रात नाही. पण त्यांच्या घरचे सगळे लोकं पाळीव प्राण्यापासून सगळेच अस्वस्थ आहेत. आमचा सगळा पक्ष, पक्षाचे नेते, राज ठाकरे यांचा परिवार कालपासून आम्ही धक्क्यात आहोत. आम्हाला अतीव दुःख झालंय. काहींनी अन्न पाणी सोडले. या दुःखातून आता कसं बाहेर पडावं याची चिंता आहे. कारण आशिष शेलार यांनी मैत्री तोडली, असं खोचक भाष्य प्रकाश महाजन यांनी करत शेलारांना डिवचलंय.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
