फडणवीस भडकले, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध, उद्धव ठाकरेंना मोठा सवाल!
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने जाहीर निषेध नोंदवला आहे. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीत असलेली शिवसेना यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मुंबईः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Sawarkar) हे ब्रिटिशांना मदत करत होते, या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केलाय. राहुल गांधींना ना धड भारताचा इतिहास माहितीये ना काँग्रेसचा इतिहास. पण माझा सवाल उद्धव ठाकरे यांना आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा ते निषेध कऱणार का?
महाराष्ट्रात भारत जोडो का तोडो यात्रा येईल तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का? हे नेते पाठवलेच तर राहुल गांधींच्या या वक्तव्याचं ते समर्थन करणार आहेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
आम्ही राहुल गांधींच्या अशा वक्तव्याचा सातत्याने निषेध करत राहू. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारतीयांच्या मनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी प्रतिमा आहे, ती ते कधीही पुसू शकणार नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. आज ही यात्रा कर्नाटकात पोहोचली. यावेळी राहुल गांधींनी रास्वसंघ व सावरकरांविषयी हे वक्तव्य केलं.
संघ आणि सावरकरांनी इंग्रजांना मदतच केली. सावरकरांना ब्रिटिशांकडून पैसे मिळत होते, अशी टीका राहुल गांधींनी केली. तसेच स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसनेच लढल्याचंही राहुल यांनी म्हटलं.
Tumkur, Karnataka | In my understanding, RSS was helping the British & Savarakar was getting a stipend from the British. BJP was nowhere to be found in the freedom struggle. BJP can’t hide such facts. Congress & its leaders fought for freedom: Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/QooPW5Ypot
— ANI (@ANI) October 8, 2022
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने जाहीर निषेध नोंदवला आहे. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीत असलेली शिवसेना यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.