भाजपाकडे संख्याबळ नाही, नाना पटोलेंचा दावा

भाजपाकडे संख्याबळ नाही, नाना पटोलेंचा दावा

| Updated on: Jun 23, 2022 | 6:56 PM

"संजय राऊत यांचं विधान हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाविकास आघाडी बाबत ते विधान नाहीय. आम्ही सर्तक आहोत. आज बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाली. आम्ही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत"

मुंबई: “संजय राऊत यांचं विधान हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाविकास आघाडी बाबत ते विधान नाहीय. आम्ही सर्तक आहोत. आज बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाली. आम्ही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. “काँग्रेस महाविकास आघाडी सोबत आहे. भाजपाने महाराष्ट्रात महाभारत घडवलं आहे, ती भाजपा अजून गप्प का? त्यांच्याकडे अजून संख्याबळ नाही” असा दावा नाना पटोले यांनी केला. “भाजपाला सत्तेची लालसा आहे. त्यांनी ईडीच्या माध्यमातून ही गडबड केलीय. ईडीच्या माध्यमातून दहशत निर्माण केली. केंद्रातील सत्तेच्या आधारावर भाजपा लोकशाहीचा खून करण्याच काम करतय, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Published on: Jun 23, 2022 06:56 PM