भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनाने निधन

| Updated on: Apr 12, 2021 | 8:32 AM

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे (Paskal Dhanare) हे 2014 साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. डहाणुतून निवडून येणारे ते भाजपचे (BJP) प्रथम आमदार होते