अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणावरून शिवसेना नेत्याची भाजपवर खरमरीत टीका, म्हणाला, ‘आता सोमय्या यांची…’
यावरून ठाकरे गटाकडून भाजपवर तर सोमय्या यांच्यावर टीका होताना दिसत आहे. आता देखील यावरूनच कणकवलीचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्या यांच्यांवर जोरदार टीका करताना भाजपवर निशाना साधला आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापलेलं आहे. त्याच्या कथित व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओवरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून ठाकरे गटाकडून भाजपवर तर सोमय्या यांच्यावर टीका होताना दिसत आहे. आता देखील यावरूनच कणकवलीचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्या यांच्यांवर जोरदार टीका करताना भाजपवर निशाना साधला आहे. यावेळी नाईक यांनी, सोमय्या आणि भाजप हे जगाला तत्वज्ञान सांगत होते. मात्र आता त्यांचे खरं स्वरूप आता समोर आलं आहे. तर सोमय्या हे दोषी आहेत हे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. पण त्यांना भाजपचे गृहमंत्री क्लिनचीट देणार हे लोकांनाही माहित आहे. तर सोमय्या यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केलेत ते सत्तेत सामिल झाले आहेत. त्यामुळे आता त्यांची गरज भाजपला संपली आहे. यामुळेच कुठे तरी त्यांच्या क्लिप भाजपकडून काढल्या जात आहेत का असा सवाल उठत असल्याचे आमदार नाईक यांनी म्हटलं आहे.